Ad will apear here
Next
‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : सगळीकडे मंदीची चर्चा सुरू असताना, पुण्यात ‘सूर्यदत्ता’तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात ४५ कंपन्या आणि हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावली. यातून साधारण २५० उमेदवारांना १२ ते ४० हजार रुपयांपर्यंतची नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व ‘फ्रेशर्स जॉबफेअर’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बावधन कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्याला पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नागपूर, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांतून आणि झारखंड, जबलपूर आदी ठिकाणांवरून उमेदवार आले होते. पदवीधर, बीई, बीटेक, फार्मसी, आयटीआय, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. एचआर, फायनान्स, सेल्स, आयटी, डेव्हलपर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, बीपीओ, केपीओ मधील पदांसाठी या मुलाखती झाल्या. इन्फोसिस, एचसीएल, अॅक्सिस बँक, जिंदाल इलेक्ट्रिक, एनआयआयटी, रिलायन्स, एच. आर. ग्लोबल, टी.एस. कन्सलटिंग, टाटा, युरेका फोर्ब्स, करियर मॅनेजमेंट, आदी कंपन्यानी यात सहभाग घेतला. 


या वेळी स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे सल्लागार सचिन इटकर, भाजप नेते किरण दगडे पाटील, ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालक शैलेश कासंडे, कॅप्टन शालिनी नायर, ‘फ्रेशर्स जॉबफेअर’चे श्रीधर गुटी आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘येथे एकाच छताखाली दोन-तीन कंपन्यांसाठी मुलाखती देण्याची संधी मिळाली, त्यामुळे नोकरीचे विविध पर्याय उपलब्ध झाले, ही दिलासादायक बाब आहे,’ असे मत उमेदवारांनी व्यक्त केले.

 

‘देशातील उद्योगक्षेत्र कठीण काळातून जात असताना अशा प्रकारचा रोजगार मेळावा होणे आणि त्याला हजारो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग मिळणे, ही आश्वासक स्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या आणि नोकरी हवी असलेल्या तरुणांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून एकत्र आणण्याचा सूर्यदत्ता संस्थेचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे,’ असे मत स्ट्रॅटेजिक फोरसाइट कंपनीचे सल्लगार सचिन इटकर यांनी व्यक्त केले.

‘कंपन्यांना चांगले मनुष्यबळ, तर विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या हव्या आहेत. या दोहोंमध्ये समन्वय घडवण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा आयोजिला. कमी कालावधीत नियोजन करूनही विद्यार्थ्यांचा आणि कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून अनेकांना नोकऱ्या मिळतील, याचे समाधान आहे,’ अशी प्रतिक्रिया सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZPACD
Similar Posts
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो
‘समतोल साधणारा अर्थसंकल्प’ ‘हा समतोल अर्थसंकल्प आहे. हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन, अॅनिमेशन या नव्याने विकसित होत असलेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके बाहेरून आयात करावी लागतात. त्यावर लावण्यात येणारे आयात शुल्क योग्य नाही. अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे उद्योग वाढीला चालना मिळेल.
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो
‘‘व्हर्च्युअल’ गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान’ पुणे : ‘फक्त इंटरनेट आणि कॉम्प्युटरची गरज असल्यामुळे सध्या ‘फिजिकल’ गुन्हेगारीपेक्षा ‘व्हर्च्युअल’ गुन्हेगारी वाढत आहे. आपले प्रोफाइल हॅक होऊ नये, यासाठी आपल्याला येणारे फसवे मेल आणि मेसेजवर करडी नजर ठेवावी. ऑनलाइन शॉपिंगवेळी आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती चोरली जाऊ शकते. याचा गांभीर्याने विचार

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language